बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाचा ‘नटरंग’ प्रयोग पुरता फसला; मिटकरींची रोहित पवारांवर टीका

Rohit Pawar – बारामती अॅग्रो कारखान्यात (Baramati Agro) झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) तब्बल ११ तास चौकशी झाली. यानंतर रोहित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसंच, त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. “ही लढाई संपलेली नसून अशीच सुरू राहणार आहे. माझ्यासाठी तब्बल १२ तास येथे जमललेल्या माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, रोहित पवारांच्या या शो बाजीवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाचा ‘नटरंग’ प्रयोग पुरता फसला. शो बाजी करायची अध्यक्षांची नेहमीची पद्धत, नेहमीचे रडगाणे, पेड कार्यकर्ते व कामाला लावलेला मीडिया इतकं सगळं करूनही नाट्यमंडळ फेल ठरलं. आता पुढचा दुसरा भाग कसा असेल याची जनतेला उत्सुकता लागलीये.अशी खोचक टीका मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य स्वागत

शरद पवारांच्या छत्रछायेखाली मोठे झालात आणि आज उलट्या तांगड्या करताय, मानेंची टीका