Sachin Kharat | अजितदादांनी सांगितलं सोलापूरातून तर प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढू, सचिन खरात यांची प्रतिक्रिया

Sachin Kharat | लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट त्यांचे उमेदवार जाहीर करू शकतात. दरम्यान सोलापूर मतदारसंघाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात ( Sachin Kharat) (Sachin Kharat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

सोलापूर हा मतदारसंघ राखीव मतदार संघ आहे, परंतु या मतदारसंघाचे गेल्या काही वर्षापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे. परंतु या परिसरामध्ये काही विकास केलेला दिसत नाही. तसेच दलित समाजावर ज्या ज्या अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस साधी भेट ही या शिंदे कुटुंबांनी दलित समाजाची भेट घेतली नाही. तसेच माझा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे अजित दादांनी जर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मला लढायला सांगितले, तर मी लढण्यासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका