CSK Full Squad IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सने कमी पैशात ‘या’ खेळाडूंना घेतले आपल्या ताफ्यात 

 CSK Full Squad IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सने कमी पैशात 'या' खेळाडूंना घेतले आपल्या ताफ्यात 

CSK Full Squad IPL 2024 :  IPL संघ चेन्नई सुपर किंग्स, म्हणजेच MS धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने IPL 2024 साठी आपला संघ पूर्ण केला आहे. काही महागडे खेळाडू घेण्यात संघाला यश मिळाले आहे, तर काही चांगले खेळाडूही अत्यंत कमी किमतीत संघाला मिळाले आहेत. यावेळी, आयपीएल 2024 साठी, महेंद्रसिंग धोनीच्या संघाने डॅरिल मिशेलच्या रूपात सर्वात महागडी खरेदी केली, ज्यासाठी संघाला 14 कोटी रुपये खर्च करावे लागले.

CSK ने आश्चर्यकारकपणे भारताचा अनकॅप्ड फलंदाज समीर रिझवीवर पैसे खर्च केले. CSK ने समीर रिझवीसाठी 8.40 कोटी रुपये खर्च केले. अलीकडेच, त्याने यूपी लीगमध्ये उत्कृष्ट स्ट्राइक रेटने खूप धावा केल्या. त्यामुळे सर्व संघांच्या नजरा त्याच्यावर होत्या. त्याचे नाव पुकारले असता अनेक संघ त्याच्यावर बोली लावण्यासाठी आल्याचे समोर आले. पण शेवटी सीएसकेने बाजी मारली. जेव्हा शेवटची फेरी झाली, तेव्हा अवनीश रावला मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना आर्वेली आपल्यासोबत घेण्यात यश आले. आता संघाकडे एक कोटी रुपये शिल्लक आहेत.

CSK ने IPL 2024 मध्ये खरेदी केलेले खेळाडू : 

डॅरिल मिशेल, समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, रचिन रवींद्र, अवनीश राव आर्वेली.

चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेले खेळाडू:

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, महेश थेक्षाना, मिचेल सँटनर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, अजय मंडल.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत

Previous Post
CSK Full Squad IPL 2024 : Chennai Super Kings took 'these' players in their team for less money

CSK Full Squad IPL 2024 : Chennai Super Kings took ‘these’ players in their team for less money

Next Post
Mumbai Indians Squad : आयपीएल 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 'इतके' खेळाडू खरेदी केले

Mumbai Indians Squad : आयपीएल 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ‘इतके’ खेळाडू खरेदी केले

Related Posts
ashish shelar

‘कितीही सत्तेचा दुरुपयोग करा पण हा आशिष शेलार झुकणार नाही’

मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे…
Read More

जो पर्यंत छगन भुजबळ यांच्या सारखे नेते आहेत तो पर्यंत काँग्रेसी विचार संपणार नाही – अशोक गहलोत

संगमनेर :- देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. त्यातून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र या…
Read More
Ganeshostav : विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सवाचे आयोजन

Ganeshostav : विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सवाचे आयोजन

Vidyarthi Sahayyak Samiti : सर्वञ गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.पुण्यातील विद्यार्थी साहाय्य्क समिती मधील…
Read More