फेमस टिकटॉक स्टार संतोष मुंडे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू; अवघा महाराष्ट्र हळहळला

बीड : विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडे यांच्यासह बाबुराव मुंडे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील संतोष मुंडे हे आपल्या मित्रांसह काळेवाडी येथील विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि विजेचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाला.

संतोषच्या हटके मराठवाड्याच्या ग्रामीण स्टाईलने रील्स बनवायचा. संतोषच्या अकाली निधनाची बातमी समजताच चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये. कारण कमी काळात संतोषने प्रसिद्धी मिळवली होती.   संतोषचे लाखांवर फाॅलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायचा.