अजितदादांच्या समर्थनार्थ भारतीय दलित कोब्रा येणार रस्त्यावर…

पुणे : आमचे आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शरद पवार कुटूंबीयांच्या कार्यपध्दती, विचारधारा, भुमिका या बाबत मतभेद आहेत. राष्ट्रवादीच्या चुकीच्या राज्य कारभाराचा दलित कोब्रा संघटनेचे ऍड. विवेक भाई चव्हाण स्वतः बळी ठरले आहेत. परंतु आयकर अजितदादाच्या बहिणी व कुटूंबीयांना त्रास देण्यासाठी टार्गेट करण्यासाठी गैरवापर करण्यात आला. त्याचा निषेध भारतीय दलित कोब्रा करत असून आयकर खात्याने अजितदादाच्या नाही तर कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या कुटूंबीयाविरोधात अकारण केवळ त्रास व छळ केला तर भारतीय दलित कोब्रा पवार कुटूंबेच नाही तर निष्पाप लोकांच्या समर्थनासाठी रस्त्यावर येईल असे प्रतिपादन भारतीय दलित कोब्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. विवेक भाई चव्हाण यांनी केले आहे. अजित पवार यांना नैतिक पाठींबा देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेवेळी भारतीय दलित कोब्रा पुणे शहर अध्यक्ष गुलाब कांबळे, मच्छिंद्र औंढेकर, व्यंकटेश मरकळ, सुनिल बगाडे, सचिन भालेराव, राहुल शिरसाट, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता गवळी, शहर अध्यक्षा लता ढेपे, मेहबुब बी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

आयकर विभागाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यात विविध ठिकाणी मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटूंबातील सदस्य, नातलग (त्यात त्यांचा पुत्र पार्थ व बहिणीच्या घरी) व कार्यालये व काही कारखान्यावर) छापे घालण्यात आले त्याची माहिती आयकर खात्यातर्फे देण्यात आली. अद्यापपर्यत परंतु कोणत्याही गुन्हयाची नोंद करण्यात आली नाही. एकाच दिवसात आयकर विभागाने अजित पवार यांचे नातलग व बहिणीच्या घरी व कार्यालये व कारखाने आदी अशा ४० धाडी घातल्या त्यातील २५ धाडी घरावर घालण्यात आल्या.

अनेक छापे तर ३-४ दिवस चालू होते व १ हजार ५० कोटींचा गपला असल्याचे सांगितले होते. नंतर आयकर खात्याच्या अधिकृत खुलासा प्रेस रिलीजमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा त्यांच्या बहिणीचे कोणाचेच नाव नव्हते, कोणाच्याच नावाचा उल्लेख नव्हता. याचा अर्थ अधिकाराचा गैरवापर करून सुडबुध्दीने व दबाव टाकण्यासाठी हे छापे घालण्यात आले. राजकारणात भुमिका, कार्यपध्दती, विचारधारा यांच्यात मतभेद असतात परंतु विरोधी मतप्रवार असलेल्या व्यक्तींच्या घरच्यांना कोणी त्रास दिल्याचे आजपर्यंत घडले नाही. असेही ऍड. चव्हाण म्हणाले.