CSKvsGT: आयपीएल २०२३च्या अंतिम सामन्यापूर्वी आली वाईट बातमी, आता कसा लागणार निकाल?

CSK vs GT IPL 2023 Final: आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मात्र या मोठ्या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची ह्रदये तोडू शकते. या सामन्यावर संकटाचे ढग दिसत आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ (Weather Reports) शकतो. याच स्टेडियमवर क्वालिफायर 2 देखील खेळला गेला, जो पावसामुळे थोडा विलंबाने सुरू झाला. आजही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता असून सोबतच शहरात वादळी वारेही वाहू शकतात. हवामानाच्या अंदाजाबाबत बोलायचे झाले तर सामन्यादरम्यान पावसाची 40 टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. या सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार असून सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

पाऊस पडल्यावर सामन्याचा निकाल कसा लागणार?
आयपीएलच्या नियमांनुसार, आयपीएल फायनलसाठी यावेळी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. परंतु चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यातील सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध आहे. पण सामन्यात एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, तर ग्रुप स्टेजमध्ये पॉइंट टेबलवर नंबर-1 असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. अशा परिस्थितीत पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनेल.