शरद पवारांची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पुन्हा एकदा देशाला…!

नवी दिल्ली – दिल्लीतल्या संसदेच्या नव्या वास्तूचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली.

उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारी ही इमारत देशाच्या समृद्धीचं आणि प्रगतीचं प्रतीक ठरणार आहे. या वास्तुतल्या कार्यालयीन व्यवस्थेत अधुनिक आणि नवीनतम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या वास्तुचा संपूर्ण परिसर 65 हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारला आहे. त्यामध्ये प्रादेशिक कला, सांस्कृतिक वारसा आणि हस्तकला यांचा वापर केला आहे. पुर्वीच्या संसद भवनाच्या तुलनेत तीनपट विस्तार असलेल्या लोकसभेच्या नव्या सभागृहाची आसनक्षमताही वाढली आहे. तिथे 888 आसनक्षमता आहे. राज्यसभेच्या सभागृहाची क्षमता 384 आहे.

या नेत्रीद्पक सोहळ्यामुळे विरोधकांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सोहळ्यावर टीका केली आहे. संसदेत धर्मकांड सुरू होतं. त्यामुळे आधुनिक भारताची नेहरूंची संकल्पना मागे पडली की काय? याची चिंता वाटत आहे. आपला देश अनेक वर्ष पाठी जात असल्याची चिंताही वाटत आहे, असं शरद पवार म्हणाले.

ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठी नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे, असा आक्षेप शरद पवार यांनी नोंदवला.