जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला जातील त्यांचे ते हात परत येतील का?  

मुंबई – मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे आग्रही आहे. राज ठाकरे यांनी दिलेली मुदत आज संपणार आहे. मनसेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची आज बैठक ( MNS Leader Meeting In Mumbai ) बोलावली. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला होता. उद्यापासून मुदत संपणार आहे. मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास कोणाचेही एकूण घेणार नाही. मशिदींसोमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला आहे. राज्यातील राजकारण यामुळे तापले आहे.

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेनंतर आता मुस्लीम समाजातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. ऑल इंडिया इमाम कॅऊन्सिल चे स्टेट रेसिडेंट मौलाना दौलत नदवी (Maulana Daulat Nadvi, State Resident of All India Imam Council)  यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी कितीही अल्टीमेटम दिले तरी मुस्लिम समाज भोंगे उतरवणार नाही. राज ठाकरेंची हैशियत नाही की ते कोणत्याही धर्माचा लाऊडस्पीकर, भोंगे काढतील. असं ते म्हणाले.

जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला जातील त्यांचे ते हात परत येतील का? याची काळजी त्यांनी घेणे गरजेचे आहे. देवाने दिलेले दोघा हातांचा उपयोग खाण्यापिण्यासाठी करावं असेही नदवी म्हणाले आहेत. राज ठाकरे हे कोण आहेत या देशात कायदा नाही का? घटना , संविधान नाही का? राज ठाकरेंचे राज या देशांत चालणार आहे का? त्यांना ते उतरवायचे तर त्यांनी न्यायालयात जावे. राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. हिंदूंचे लीडर दाखवून देण्यासाठी मुस्लिम समाजाला राज ठाकरे टारगेट करत असल्याचे दौलत नदवी म्हणाले आहेत.