बायको कतरिना कैफकडून मार खातोस का? अभिनेता विकी कौशलचं भन्नाट उत्तर

‘द कपिल शर्मा शो’च्या (The Kapil Sharma show) आगामी एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) कॉमेडीचा जबरदस्त आनंद लुटताना दिसत आहेत, तर अभिनेता विकी कौशल वैवाहिक जीवनाशी संबंधित असे काही सांगतो, जे ऐकून सगळे हसायला लागतात.

द कपिल शर्मा शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये कॉमेडियन कपिल विकी कौशलला विचारतो की काय चालले आहे पाजी. गेल्या काही चित्रपटांमध्ये तुम्ही विवाहित आहात आणि तुम्ही तुमच्या पत्नीशी खूप भांडत आहात. म्हणूनच विक्की कौशल त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो, पाजी खूप वाद होत आहेत, मागच्या चित्रपटात मला मार पण खावा लागला होता. मात्र खऱ्या आयुष्यात तर असं होत नाही…! विकी कौशलचे मजेशीर उत्तर ऐकून सगळेच हसायला लागतात.