सामान्य माणसाच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल, तर फडणवीस यांनी गांडूचं राजकारण केलं; आंबेडकरांची टीका

अकोला : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व होत असताना आता दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलीय. ते अकोल्यात बोलत होते. टीव्ही9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

आंबेडकर म्हणाले, मी असं समजत होतो की, देवेंद्र फडणवीस हे मैदानी खिलाडी आहेत. परंतु, त्यांचा दिलेरपणा दिसला नाही. त्यांचा मैदानीपणाही दिसला नाही. त्यांनी जी टेप सभापतींना दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल, तर गांडूचं राजकारण केलं.

दिलेरपणाचं राजकारण करायचं असेल तर ती टेप त्यांना लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. त्यांनी लोकांसमोर जाहीर केली असती तर पोलिसांनी ही नोटीस दिली नसती. सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली आहे. जबाब कुठेही होओ. पण, मी आपल्यासमोर सामान्य माणसाची प्रतिक्रिया मांडलेली आहे, असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.