राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता; महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देणार? 

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने एका बाजूला राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला मविआ देखील व्यूहरचना करत आहेत.असे असतानाच अमरावती (Amravati)  जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मोठा दावा केला आहे.

“राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) झाल्यावर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील. त्यामुळे भाजपच्या (BJP) विरोधात एकच पक्ष राज्यात उरणार असल्याचा दावा,” रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना रवी राणा म्हणाले की, “ज्या पद्धतीने संपूर्ण देश, ज्या भावनेने राम मंदिर कधी बनणार, पत्र्याच्या शेडमध्ये असलेले राम लल्ला भव्य राम मंदिरात कधी विराजमान होणार याची आतुरता होती. अनेक विरोधी पक्षांनी राजकारण केलं. ‘राम मंदिर हम बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे’ असे होते. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बनवलं सुद्धा आणि तारीख देखील सांगितली. 22 तारखेला देशाचं आस्थेचं स्थान, श्रद्धा स्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.” असे राणा म्हणाले.

पुढे बोलतांना रवी राणा म्हणाले की, “देशातील अनेक जे पक्ष एकत्र झाले आहेत. ते सर्वजण संभ्रमात आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या सर्व पक्षांचा संभ्रम दूर होणार आहे. त्यानंतर देशातील अनेक पक्ष मोदी यांना पाठिंबा देतील. महाराष्ट्रातील देखील महाविकास आघाडीमधील दोन पक्ष जेव्हा मोदींना जुळतील, तेव्हा महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात एकच पक्ष राहणार आहे. आणि हा पक्ष कोणता आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राजकीय बदल आपल्याला पाहायला मिळतील,” असेही राणा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’