राष्ट्रवादीच्या बैठकीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय – सुनिल तटकरे 

Sunil Tatkare – एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णयही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे. त्यानंतर दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.

आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर विचारमंथन आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षातील विविध पदांच्या नियुक्त्या, बुथ कमिट्या नियुक्ती, याशिवाय जिल्हयाची देण्यात आलेली जबाबदारी याबाबत माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांनी घेण्यात आली. आगामी काळात महिला, विद्यार्थी, युवतींसाठीही मेळावे घेणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

युवकांचे मेळावेही राज्यभर घेणार आहोत यादृष्टीकोनातून विचारमंथन व वाटचाल करण्यासाठी राज्यभरातील पदाधिकार्‍यांची आज मॅरेथॉन बैठक पार पडली.

काही प्रसिद्धीसाठी हपापलेले व्यक्ती स्वतः च्या महत्वाकांक्षेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. येणाऱ्या काळात एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुतीच्या सोबत निवडणूक लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल या अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूकीला सामोरे जाणार आहोत हा निर्णय आमचा पूर्वीच ठरला आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली