लोकशाही वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार, शरद पवार यांचे लक्षवेधी वक्तव्य

Sharad Pawar: खासदारांच्या निलंबनाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. असे शरद पवार यांनी बोलताना म्हणाले आहेत.

पवार म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर देशाच्या संसदेसाठी आणि लोकशाहीसाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी एकत्रित लढण्यासाठी तयार आहे असे यावेळी शरद पवार म्हणाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सदस्यांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या प्रमुखांकडून आज शुक्रवारपासून देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी करण्यात येत आहे.

शरद पवार म्हणाले की, आज प्रत्येक गावात गेल्यावर या देशातील जनतेच्या उपासमारीचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. काम करणारे युवकांना मेहनतीचा मोबदला मिळत नसल्याने दुःखी आहे. देशातील आदिवासी असो वा दलित असो गावात राहून आपले प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे दु:खी आहेत. या समस्यांना कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे. आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि कठोर परिश्रम करून लोकशाहीवर आघात करणारी ही सामुदायिक शक्ती दूर करू यावर मात करण्यासाठी आपण एकजूट राहू या असा विश्वास शरद पवार  यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली