Kangana Ranaut | ‘हीच योग्य वेळ’ म्हणत अभिनेत्री कंगना रणौत हिने राजकारणात उतरण्याचे दिले संकेत

Kangana Ranaut On Politics : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे ती कधी-कधी वादातही अडकते. कंगना ज्याप्रकारे प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यास मागेपुढे पाहत नाही त्यामुळे तिच्या राजकारणात प्रवेशाबाबत अनेकदा चर्चा होत राहतात. आता कंगनाने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत म्हटले आहे की, राजकारणात येण्याची हीच योग्य वेळ आहे.

टीव्ही9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, मी अनेक चित्रपटांच्या सेटसाठी राजकीय पक्षांशी लढले आहे. ते मला दूर ठेवत नाही, मला माझ्या देशासाठी जे करायचे आहे ते करायला जागा देत नाही. पण, मला राजकारणात यायचे असेल तर कदाचित हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते.

या देशाने मला खूप काही दिले आहे
कंगना पुढे म्हणाली, या देशाने मला खूप काही दिले आहे, जे परत देण्याची जबाबदारी मला खूप मोठी वाटते. मी नेहमीच राष्ट्रवादी राहिले आहे आणि हीच प्रतिमा माझ्या अतिशय प्रसिद्ध अभिनय कारकिर्दीत पोहोचली आहे. मला नेहमी सर्वांकडून खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मी एक संवेदनशील व्यक्ती आहे
काही काळापूर्वी कंगनाने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘मी खूप संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती आहे. मी राजकीय व्यक्ती नाही. मला राजकारणात येण्यासाठी अनेकवेळा विचारण्यात आले पण मी तसे केले नाही.’

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना राणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. कंगना राणौतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कंगनाने इमर्जन्सीमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी