‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चन है’ असा डायलॉग सुप्रिया सुळे यांनी मारला आहे. कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है. आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्ष ते विरोधात होते, तर अर्धी वर्ष सत्तेत, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.