चीनमध्ये युक्रेनियन वधूंची मागणी वाढली; जाणून घ्या नेमकं काय आहे कारण

बीजिंग – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे. रशियन हल्ल्याच्या वेळी, युक्रेनमधील लोकांना घरे सोडून इतरत्र आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे. एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला चीनमध्ये युक्रेनियन वधूंची मागणी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. क्रेनियन नववधूंसाठी चिनी पुरुषांच्या वाढत्या स्वारस्याबद्दल एका ऑनलाइन वेबसाइटने याबाबतची माहिती जारी केली आहे.

वा इसच्या बातमीनुसार, डेटिंग सर्व्हिस मेलिष्काने सांगितले की, युद्ध सुरू होण्यापूर्वी दररोज सुमारे 5 चौकशी होत होत्या. जे आता दुप्पट झाले आहे. डेटिंग सेवेचे रशियन मालक पावेल स्टेपनेट्स म्हणाले – आता बरेच ग्राहक युक्रेनियन मुलींची मागणी घेऊन येतात. त्यांना माहित आहे की युक्रेनच्या मुली आता दुःखी असतील आणि ते चीनला स्वतःसाठी सुरक्षित मानतील. म्हणूनच चिनी पुरुषांना वाटते की मुली चिनी पतींना एक चांगला पर्याय म्हणून पाहतील.

मेलिश्का डेटिंग सेवेच्या वेबसाइटनुसार, 748 युक्रेनियन मुली सध्या चिनी पतीच्या शोधात आहेत. स्टेपनेट्सचा दावा आहे की 70 चिनी मुले स्वतःसाठी वधू शोधत आहेत. 8 ते 9 लोकांची जोडपी तयार झाली, ज्यांनी नंतर लग्न केले. चीनमध्ये लग्नासाठी आपल्या देशातील मुली मिळणे अवघड आहे. चीनच्या एक मूल धोरणामुळे हे घडले आहे. त्यामुळे चीनमध्ये लिंग गुणोत्तर खूपच खराब झाले आहे.

चीनच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. चीनमध्ये एका कुटुंबाला एकच मूल होण्याची परवानगी होती. हा नियम 35 वर्षे लागू राहिला. या धोरणामुळे कुटुंबातील लोकांनी मुलीऐवजी मुलगा असणे पसंत केले. त्याच वेळी, युक्रेनमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्टेपनेट्स म्हणाले की चिनी पुरुषांना पूर्व युरोपातील मुली जास्त आवडतात. कारण ते चिनी मुलींप्रमाणे पैशाच्या मागे धावत नाहीत.