देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखवली – रामदास आठवले

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू कल्पक नेतृत्वामुळे भाजप ला मोठा विजय मिळाला असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला आपले जागा दाखविली आहे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या 3 जागा जिंकून आणल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप चे प्रदेश अध्यक्ष चांद्रकांत पाटील यांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. भाजप चे राज्यसभा उमेदवार केंद्रीयमंत्री पियुष गोयल,अनिल बोंडे, धनंजय महाडिक या विजयी उमेदवारांचे रामदास आठवले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धोबीपछाड देत कौशल्याने भाजपची तिसरी जागा जिंकून आणली आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती शिकविली आहे. तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे. अशी कविता सादर करून रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.