Ram Mandir Ayodhya : अमिताभ, माधुरी ते रजनीकांतपर्यंत राम मंदिराच्या उद्घाटनाला अयोध्येत सेलिब्रिटींची हजेरी

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत आज होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा (Ram Temple Pranpratishta) सोहळ्यानिमित्त पुण्यात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. घरोघरी श्रीरामाचे चित्र असलेले आकाशकंदिल; भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. चौकाचौकांतही भगव्या पताकांच्या माळा, श्रीरामांचं भव्य आकर्षक चित्र, विद्युत रोषणाई असं उत्सवी वातावरण कालपासूनच दिसत आहे.

शिवाजी मानकर

दरम्यान, प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास, मोहनलाल, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, धनुष, शंकर महादेवन, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, दिपिका चिखलिया, हेमा मालिनी, ज्युनियर एन्टीआर, मोहनलाल, मनोज मुंतशीर, एसएस राजामौली, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, सरोद वादक अमजद अली हे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी