‘पुढच्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत’

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

यातच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पुढच्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी लवकरच अविश्वास ठराव आणणार आहोत.  असं अपक्ष पण भाजपला जाहीर पाठिंबा असलेले आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान विधानपरिषदेच्या मतदानात काँग्रेसचे आणि शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. शिवसेनेचे तब्बल १२ तर काँग्रेसचे ३ आमदार फुटले असल्याचं बोललं जातंय. तर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील आमदारांनी सरकारवरील राग व्यक्त केला असल्याचं सांगितलं आहे.