“मी कृषिमंत्री असलो तरी अनेक अडचणी”; धनंजय मुंडे मंत्रिपदावर नाराज?

बीड – २०१४ ला कठीण परिस्थितीत दादांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. मी संघर्ष केला हे ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात माझ्या दैवताने लिहिला आहे हा माझा इतिहास आहे असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटावर हल्लाबोल केला आहे. ते बीड मधील सभेत बोलत होते.

बीड जिल्ह्याची सभा ठरली त्या दिवसापासून मला अनेक जणांनी विचारले. ही उत्तर सभा आहे का? त्यावेळी मी नम्रपणे ही सभा बीड मायबाप जनतेचे उत्तरदायित्वासाठी ठेवली आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. १७ ऑगस्टच्या सभेत माझ्यावर टिका झाली. या जिल्ह्याला अजितदादांनी भरभरुन दिले म्हणून ही उत्तरदायित्वाची सभा आहे. विकासाची, अस्मितेसाठी दुष्काळ कायम मिटविण्यासाठी ही सभा आहे असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

एकच दादा अजितदादा (Ajit Pawar) उगाच म्हणत नाहीत. मै जो बोलता हू वो करके दिखाता हू… असा शेर धनंजय मुंडे यांनी अजितदादा यांच्या कामाबद्दल व्यक्त करतानाच अजितदादा पवार यांनी विकासावर बोलावं… मायबाप जनतेला वादा करावा अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

कापूस पिकवण्याची ताकद माझ्या जनतेच्या मनगटात जशी आहे तशीच सहा महिने ऊस तोडायला जाणार्‍या माझ्या ऊसतोड कामगाराच्या तेवढीच मनगटात ताकद आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ दिले. ऊसतोड मजूरांचे अथक परिश्रम डोळ्यांनी बघत अर्थमंत्री अजित पवार ऊसतोड कल्याण महामंडळ काढले नाहीतर त्यांना निधीही दिला हे उपकार कधी विसरू शकत नाही. त्याबद्दल दादांचे अभिनंदन व आभार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

मनात आणले तर मायबाप सरकारला शब्द दिला तर इथला दुष्काळ संपू शकतो भले थोडी तिजोरी खोलावी. तुम्ही आजचं प्रेम बघून जास्त अपेक्षा तुमच्याकडून ठेवली तर ते वावगं ठरू नये असेही धनंजय मुंडे म्हणाले.सवाल इस बात का नही है शिसा बचा है की टुटा है, सवाल ये है की पत्थर किसका है असा शेर म्हणत विरोधकांना टोला लगावला.

माझ्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे. मंत्री असूनही आज तुम्ही विश्वासाने कृषीमंत्री पदाची जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी बीडमधील जनतेला दिले.कुणीही उठावं आणि काही बोलावं.. बीड जिल्ह्य़ात येऊन दादांना कोण लबाड बोलत असेल तर हे साहेबांचे संस्कार नाहीत. स्टेजवर जातीयवादी विचार व्यक्त केले जात असतील तर ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले. लोगोंनो मुझे मिट्टीमे दबाने की लेकीन मै बीज हू… अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीची झलक दाखवून दिली.