आशिया चषकाच्या संघातून चहलला वगळल्याने संपातली धनश्री, रागाच्या भरात म्हणाली…

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. चहलच्या फिरकीसमोर मोठे मोठे गोलंदाज नाचताना दिसले आहेत. असे असूनही आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही. सोमवारी कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये चहलचे नाव नव्हते. त्यानंतर त्याचे समर्थक या बातमीने नाराज दिसले. त्याचवेळी त्याची पत्नी धनश्री (Dhanashree Verma) हिने आपला संताप व्यक्त करताना सोशल मीडियावर आरोप केला आहे.

चहलची पत्नी धनश्रीने नाव न घेता निवड समितीवर निशाणा साधला आहे. तिने सोशल मीडियावर एक नोट लिहिली आहे, ज्याद्वारे तिने अप्रत्यक्षपणे निवड समितीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करताना धनश्रीने लिहिले आहे, ‘आता मी यावर गंभीरपणे प्रश्न विचारत आहे की खूप नम्र आणि मितभाषी असणं हे तुमच्या कामाच्या वाढीसाठी हानीकारक असतं का? किंवा आपल्याला आयुष्यात पुढं जाण्यासाठी सतत बोलत राहणं आणि स्ट्रीट स्मार्ट असंण गरजेचं आहे?’