लाजवाब! फक्त ९ चेंडूत अर्धशतक ठोकत नेपाळच्या फलंदाजाने मोडला युवराज सिंगचा विश्वविक्रम

Fastest 50 in T20 Internationals: आशियाई गेम्स 2023 च्या (Asian Games 2023) पुरुष क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात नेपाळच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. या खेळाडूने युवराज सिंगचा विश्वविक्रम (Yuvraj Singh World Record) मोडला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा T20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा (Fastest T20 Fifty) विक्रम मोडला गेला आहे. युवराज सिंगने 12 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता, मात्र या खेळाडूने केवळ 9 चेंडूत अर्धशतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकले होते. आता नेपाळच्या दीपेंद्र सिंग आयरीने हा विक्रम मोडला आहे. दीपेंद्र सिंगने केवळ 9 चेंडूत T20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. या काळात दीपेंद्र सिंगने (Dipendra Singh Airee) 10 चेंडूत 8 षटकारांसह नाबाद 52 धावा केल्या. त्याचवेळी दीपेंद्रने पहिल्या 6 चेंडूत 6 षटकार ठोकले.

नेपाळचा फलंदाज कुशल मल्लानेही (Kushal Malla) T20 च्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. कुशल मल्लाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 35-35 चेंडूत शतक झळकावणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांचा विक्रम मोडला आहे. कुशल मल्लाने मंगोलियन संघाविरुद्ध अवघ्या 34 चेंडूत शतक झळकावले आहे. मल्लने 50 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने एकूण 137 धावा केल्या.

https://youtu.be/sStgV_m3FeE?si=NZVfXPWs-7mX7C6S

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश