“माझ्या मुलांनी समलैंगिक असल्याचं सांगितलं तर मी त्यांच नात..”, महेश मांजरेकरांचं मोठं विधान

मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे समलैंगिक या विषयावर भाष्य करणारी ‘एका काळेचे मणी’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या वेब सीरिजच्या प्रोमोशननिमित्त महेश मांजरेकरांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समलैंगिकतेबद्दल मोठे (Mahesh Manjrekar on Gay Relationship)विधान केले.

मराठीमध्ये समलैंगिकतेवर वेब सीरिज बनवण्याचा विचाराबाबत मांजेरकरांना प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी सांगितलं की, उद्या माझ्या मुलाने जर तो गे रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं तर मी त्याचं नातं स्वीकारेन. कारण हा मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि ही त्याची आवड आहे. जर माझ्या मुलीनेही असं सांगितलं तर मी त्यांच्या नात्याचा आनंदाने स्वीकार करेन असं सांगितलं. महेश मांजरेकरांनी या मुद्यावरून पालकांनी आपल्या मुलांचं रिलेशनशिपमधील नातं कसं स्वीकारावं हे सांगितलं आहे.