औरंगजेबाच्या मजारवर आमचं प्रेम, अफझलखानाची कबर आम्हाला प्यारी.. ; मनसेची ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर टीका

Mumbai – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल (Shiv Sainik arrives in Ayodhya) झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसेचे नेते योगेश चिले यांनी या दौऱ्यावरून टीका केली आहे. ते म्हणाले, मशिदींवरचे भोंगे हटवायची आमची हिंमत नाही, रस्त्यावरचे नमाज बंद करायची आमची कुवत नाही, कोणी हनुमान चालिसा म्हटली की आम्हाला कापरं भरतं, औरंगजेबाच्या मजारवर आमचं प्रेम, अफझलखानाची कबर आम्हाला प्यारी.. ऐसेमे सिर्फ सेटींगवाले अयोद्धा टूर करके हिंदूत्व कैसे सिद्ध होगा “छोटे मा. मु.” असं म्हटले आहे.