मोक्षदा एकादशीच्या दिवशी करा हे व्रत, होईल श्री विष्णू कृपा !

पुणे : आज मोक्षदा एकादशी आहे . त्या निमित्ताने श्री विष्णूची कृपा व्हावी, मृत्यू नंतर मोक्ष प्राप्ती व्हावी, घरातील अपमृत्यु टळावेत तसेच घरातील मृतात्म्यांना सद्गती मिळावी यासाठी आज व्रत करावे अशी मान्यता आहे.

विज्ञान जेथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते असे म्हणतात . त्यांनुसार श्री विष्णू हि आपली पालन करता आहे. असे मानले जाते . ज्या प्रमाणे आपले आई वडील आपल्या चांगल्या कृत्याची प्रशंसा करतात . तसेच तुमच्या वाईट कृत्याला तुम्हाला खडेबोल सुनावले जातात . वेळप्रसंगी दंड देखील मिळतो. त्याचप्रमाणे श्रीविष्णू तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट कृत्यावर तुम्हाला मिळणारे चांगले वाईट फळ पदरात देते.

वेळो वेळी श्री विष्णूनी पृथ्वीवर मानवी रूपात जन्म घेऊन मनुष्याला धर्म अधर्माचे ज्ञान दिले . मृत्यू नंतर काय होते याचा आजपर्यंत विज्ञान शोध लावू शकले नाही . परंतु पुराणात मृत्युलोकाचे अनेक दाखले आहेत. श्रीविष्णूची कृपा व्हावी . यासाठी आज मोक्षदा एकादशी निमित्त हे व्रत करावे.

मोक्षदा एकदाशी दिवशी सकाळी स्नान केल्या नंतर देवाची पूजा करताना श्री हरी विष्णूची उपासना करावी . जमले तर आज उपवास करावा. आज विष्णू प्रतिमा किंवा बाळकृष्णाला पिवळे पुष्प आणि तुळस वाहावे . गंध लावावे , धूप , तूप निरांजनाने आरती करावी . आरती करताना नेहमी प्रथम श्री गणेशाची आरती करावी , श्री विष्णूची आरती करावी त्यानंतर आपल्या कुलदेवतेची आरती करावी. आज श्रीविष्णूला गोड न्येवेद्य दाखवावा. न्येवॆद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवावे .

आज मंत्र पठण केल्याने देखील सुख समृद्धी वाढते तसेच मोक्ष प्राप्ती मिळते अशी मान्यता आहे . आज या पैकी इच्छित प्राप्तीनुसार मंत्र जप करावा .

1. सुख और शांति साठी विष्णु गायत्री मंत्राचा जप करावा
ऊं नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

2. श्रीविष्णु भगवते वासुदेवाय मंत्र
ओम नमोः भगवते वासुदेवाय॥

3. विष्णु कृष्ण अवतार मंत्र:
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे।
हे नाथ नारायण वासुदेवाय।।

4. विष्णु रूपं पूजन मंत्र
शांताकारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम्।
विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम्।
लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।
वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकेकनाथम्।

5. मंगल श्री विष्णु मंत्र
मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुणध्वजः।
मङ्गलम् पुण्डरीकाक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥