‘राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक…’ T20 World Cup संदर्भात जय शाह यांनी केली मोठी घोषणा

T20 World Cup 2024: बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी याची पुष्टी केली आहे की यावर्षी जूनमध्ये आगामी टी -२० विश्वचषक (T20 World Cup) होईपर्यंत राहुल द्रविड भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक अंतिम फेरीनंतर द्रविडचा करार संपला होता, परंतु डिसेंबर-जानेवारीच्या दौर्‍यासाठी त्याचा व इतर सहयोगी कर्मचार्‍यांशी करार करण्यात आला.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने शाहने ही घोषणा केली. जय शाह म्हणाले, “२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल भाई यांना ताबडतोब दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यासाठी निघून जावे लागले. यादरम्यान आम्हाला भेटण्याची संधी मिळाली नाही. आम्ही ठरवले आहे की राहुल भाई पुढील टी२० विश्वचषक (T20 World Cup)होईपर्यंत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहतील. ”

आता आणखी बैठक होईल
तथापि, शाह यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमापूर्वी आणखी काही विषयांवर चर्चा केली असे सूचित केले. जय शाह म्हणाले, जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मी द्रविडशी बोलतो, आता बॅक-टू-बॅक मालिका घडत आहे. तो दक्षिण आफ्रिकेत होता, त्यानंतर अफगाणिस्तान आणि आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका. दरम्यान बोलण्याची आम्हाला तितकी संधी मिळाली नाही.

खेळाडूंना दिलेल्या सूचना
शाह म्हणाले की, आयपीएल फ्रँचायझीला बीसीसीआयने केंद्रीय करार केलेल्या खेळाडूंसाठी ठरवलेल्या व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागेल. जय शाह म्हणाले, “हा बीसीसीआयची आदेश आहे. बीसीसीआय ही सर्वोच्च संस्था आहे. बीसीसीआय जो काही निर्णय घेईल, तो फ्रँचायझीला मान्य करावा लागेल. आम्ही फ्रँचायझीच्या वर आहोत.”

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज