जगातील सर्वांत प्रदूषित शहरांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर, मुंबई, पुणे कितव्या स्थानी?

Most Polluted Cities In India: भारतात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. दिवे आणि फटाक्यांनी सर्व शहरे उजळून निघाली आहेत. मात्र दुसरीकडे वायू प्रदूषणामुळे भारतीय त्रासले आहेत. देशात वायू प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्याला परवानगी दिली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारत देशभर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यामुळे देशातील तीन शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून गणली गेली आहेत. यामध्ये पहिल्या नंबरवर देशाची राजाधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. स्वीस ग्रुप IQAir ने हा अहवाल दिला आहे.

कुठे किती AIQ?

  • दिल्ली – ४१२
  • लाहोर- २६२
  • बघदाद – २०६
  • कराची – १९७
  • कुवैत – १६८
  • कोलकत्ता – १६७
  • ढाका – १५५
  • मुंबई – १५४
  • सरजेवो – १५३
  • दोहा- १४९
  • जकार्ता – १२६
  • काठमांडू – ११५
  • शेन्यांग (चीन)- ११३
  • रियाध (सौदी अरेबिया) – १०७
  • कम्फांळा (युगांडा) – ९९

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत