कॉंग्रेसमध्ये भूकंप : बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

Balasaheb Thorat : कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीमाना दिल्याची माहिती समोर येत आहेत. बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांंनी राजीमामा दिला असल्याची सध्या चर्चा आहे.

बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.