संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Mumbai – शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावण्यात आली आहे. ईडीने आठ दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केली होती. मात्र त्यांना 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. न्यायमुर्ती एम जी देशपांडे यांनी सुनावणी घेतली होती.

दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे. विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.