देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच होणार

मुंबई – देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर जाणार आहेत. यानंतर संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे राजभवनात यासाठी तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, आत्ताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असून आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.