हिवाळ्यात रोज खा एक संत्री..! इम्युनिटी वाढवण्यापासून होतील बरेच चमत्कारिक फायदे

Winter Tips: सध्या हिवाळा सुरू असून दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे. हिवाळ्यात रोग प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे सर्दी-ताप होण्याच्या शक्यताही वाढतात. अशात शरीराला सदृढ ठेवण्यासाठी आणि थंडीतही रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्री या फळाचे सेवन करावे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. संत्री रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि रोगांपासून मानवी शरीराचे संरक्षण करते.

हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनशक्ती मजबूत करते. विरघळणारे फायबर जास्त काळ पोट भरलेले ठेवते, ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाणही कमी राहते.

संत्र्याचे सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. लघवीमध्ये सायट्रेट नसल्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. सायट्रेट हे सायट्रिक ऍसिड आहे, जे सामान्यतः लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळते जसे की संत्री. किडनी स्टोन रुग्णांना सहसा एक ग्लास संत्र्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे लघवीमध्ये सायट्रेटची पातळी वाढते, ज्यामुळे स्टोन बनण्याची शक्यता कमी होते.

लिंबूवर्गीय फळे विशेषतः संत्री स्ट्रोकचा धोका कमी करतात. असे मानले जाते की संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयविकाराच्या वाढीस प्रतिबंध करतात. यासोबतच ते रक्तपेशींचे कार्य सुधारतात.

संत्री केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपली त्वचाही चांगली ठेवते. हे मुरुम, डाग दूर करते आणि त्वचा चमकदार बनवते.