ठाकरेंना ट्वीट करून तर रामदास कदमांना भेटून एकनाथ शिंदे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मुंबई – शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना त्यांच्या  कांदिवली येथील पालखी या  निवासस्थानी भेटून खूप खूप शुभेच्छा दिल्या.दरम्यान, काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा देखील वाढदिवस होता मात्र शिंदे यांनी त्यांना केवळ ट्वीट करूनच शुभेच्छा दिल्या होत्या.

राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत त्यांनी रामदास कदम यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आज झालेल्या या सदिच्छा भेटीला एक विशेष महत्व होते.

शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर डौलाने फडकत असतानाच रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशाने सुरु करावी याच शुभेच्छा त्यांनी यावेळी कदम यांना दिल्या. यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही सुपुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर (MLA Yogesh Kadam and Siddhesh Kadam, MLA Balaji Kalyankar) आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते.