“मी नरेंद्र मोदींचा चाहता”, एलॉन मस्क यांनी न्यूयॉर्कमध्ये घेतली भारतीय पंतप्रधानांची भेट

Narendra Modi Meets Elon Musk :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांची त्यांच्या चार दिवसीय अमेरिका दौऱ्यात भेट घेतली. इलॉन मस्क यांना भेटण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध प्रोफेसर नसीम तालेब आणि प्रोफेसर रॉबर्ट थर्मन यांचीही भेट घेतली. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी या भेटीचे वर्णन केले आहे.

ते म्हणाले की, माझे पंतप्रधान मोदींसोबतचे संभाषण खूप चांगले होते. पुढच्या वर्षी भारतात येण्याचा विचार करत असल्याचंही मस्कने सांगितलं. इलॉन मस्क पुढे म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे.