‘व्हॉईस ऑफ इंडिया’ फेम मोहम्मद झाकीर हुसैन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

इंडियन आयडॉल फेम झाकीर हुसैन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोरबा झोनचे प्रसिद्ध गायक-कलाकार अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया फेम मोहम्मद झाकीर हुसैन (Mohammad Zakir Hussain) यांचे मंगळवारी एका खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. आपल्या आवाजाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करणारे झाकीर हुसेन हे कुटुंबासह बिलासपूरला गेले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

बिलासपूर येथे आलेले झाकीर हुसैन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी काही वेळातच अखेरचा श्वास घेतला. काही समजण्यापूर्वीच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी व मुलांसह संपूर्ण परिवार आहे. त्यांचे पार्थिव जुनी बस्ती वॉर्ड क्रमांक 4, राणी रोड, धनवर पारा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. बुधवारी कोरबा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.