‘आदिपुरुष’च्या वादग्रस्त संवाद लेखनामुळे चर्चेत आलेले मनोज मुंतशीर यांची न ऐकलेली कहाणी

Manoj Muntashir Biography: ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचे संवाद लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या मनोज मुंतशीर शुक्ला (Manoj Muntashir Shukla) यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1976 रोजी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज येथे झाला. त्यांनी 1994 मध्ये एचएएल स्कूल, अमेठी येथून शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी घेतली.

मनोज हे ब्राह्मण कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आणि आई शिक्षिका होती. ते त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहेत. त्यांच्या पत्नी नीलम मुंतशीर या लेखिका आहेत. दोघांना आरू नावाचा मुलगा आहे.

700 रुपये घेऊन मुंबई गाठली
मनोज यांनी शालेय जीवनापासूनच कविता लिहायला सुरुवात केली. त्यांचे मित्र त्यांना मुशायराला घेऊन जायचे, जिथे ते त्यांच्या कविता ऐकवायचे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 1999 मध्ये ते कामाच्या शोधात मुंबईला निघाले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 700 रुपये होते.

मुंबईत त्यांनी भजनसम्राट अनूप जलोटा यांची भेट घेतली. त्यांनी मनोजला भजन लिहायला सांगितले. मनोजने यापूर्वी कधीही भजन लिहिले नव्हते, पण त्यांनी पैशासाठी लिहिण्याचे मान्य केले. भजन लिहिल्यावर अनूपने त्याला 3000 चा चेक दिला, जो मनोजची पहिली कमाई होती. 2004 मध्ये त्यांना रंग रसिया या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी मिळाली, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट दहा वर्षांनी 2014 मध्ये प्रदर्शित झाला.

बिग बींनी संधी दिली
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यामुळेच त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. बिग बींनी त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’चे डायलॉग लिहायला दिले. यासोबतच मनोजने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘झलक दिखला जा’, ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ सारख्या इतर रिअॅलिटी शोच्या स्क्रिप्ट्सही लिहिल्या आहेत.

2005 मध्ये आलेल्या ‘यू, बोमसी एन मी’ या चित्रपटासाठी गाणी लिहून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी चार गाणी लिहिली. 2014 मध्ये श्रेया घोषालच्या पहिल्या गझल अल्बम ‘हमनशीन’साठी त्यांनी काही गाणी लिहिली, जी एक चार्टबस्टर ठरली.

मनोज यांची लोकप्रिय गाणी
मनोजने बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली: द कन्क्लूजन, जय गंगाजलच्या हिंदी आवृत्त्या, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, बादशाहो यांसारख्या चित्रपटांची सर्व गाणी लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी एक व्हिलनचे गलियाँ, हाफ गर्लफ्रेंडचे फिर भी तुमको चाहूंगा, बत्ती गुल मीटर चालूमधील देखते देखते, कबीर सिंगचे कैसे हुआ आणि केसरीचे तेरी मिट्टी ही गाणी गायली आहेत.

बाहुबली: द बिगिनिंगच्या हिंदी आवृत्तीसाठी संवाद लिहून त्यांनी पटकथा लेखक म्हणून पदार्पण केले. बाहुबली: द कन्क्लूजन, साई रा नरसिम्हा रेड्डी, मार्व्हलच्या ब्लॅक पँथरच्या हिंदी आवृत्तीसाठीही त्यांनी संवाद लिहिले आहेत.