‘मी शरद पवारांना मारू शकतो, असे वक्तव्य केल्यावरही गुन्हा दाखल होणार नाही असे जनता गृहीत धरेल’

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पटोले यांचा हाच व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे . हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मारण्याची भाषा केल्याने कॉंग्रेसवर मात्र आता टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, आता भाजप नेत्यांनी पटोले आणि कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.यातच आता भाजप नेते प्रदीप गावडे यांनी केलेलं एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विट मध्ये ते म्हणतात, जर पोलिसांनी “मी मोदींना मारू शकतो” या नाना पटोले याच्या वक्तव्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर उद्या कोणी “मी राहुल गांधीला मारू शकतो”, “मी शरद पवारांना मारू शकतो” असे वक्तव्य केल्यावरही गुन्हा दाखल होणार नाही असे जनता गृहीत धरेल असं त्यांनी म्हटले आहे.