गेल्या ४० वर्षात कुणालाही न जमलेला विक्रम कर्णधार रोहितने केला, बॅटने नव्हे चेंडूने रचला इतिहास

Rohit Sharma Record: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) नेदरलँड्सविरुद्ध (IND vs NED) खेळल्या गेलेल्या सामन्यात इतिहास रचला. मात्र, यावेळी वर्ल्डकपमध्ये हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने बॅटने नव्हे तर चेंडूने चमत्कार केले आहेत. नेदरलँडचा फलंदाज तेजा निदामनुरूची विकेट घेऊन भारतीय कर्णधाराने गेल्या 40 वर्षांत कुणीही न करू शकलेला पराक्रम गाजवला आहे.

रोहितने चेंडू टाकून इतिहास रचला
रोहित शर्माने नेदरलँड्सच्या डावातील शेवटची विकेट घेतली आणि भारतीय संघाला 160 धावांनी विजय मिळवून दिला. भारतीय कर्णधाराने नेदरलँडचा सर्वाधिक धावा करणारा तेजा निदामनुरूला मोहम्मद शमीकडे झेलबाद केले. 50 षटकांच्या विश्वचषकात 40 वर्षांनंतर एका भारतीय कर्णधाराने एकाच सामन्यात अर्धशतक आणि विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यासोबतच रोहित गेल्या 20 वर्षांत वर्ल्ड कपमध्ये विकेट घेणारा पहिला भारतीय कर्णधार आहे.

बॅटनेही धमाल केली
फलंदाजीतही रोहित शर्माने नेदरलँडविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. हिटमॅनने 54 चेंडूंचा सामना करत 61 धावांची जलद खेळी खेळली. रोहितने आपल्या खेळीत 8 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार मारले. भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या साथीने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 11.5 षटकांत 100 धावा जोडल्या.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत