घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवणाऱ्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? बावनकुळेंचा पवारांवर हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: नुकताच रामनवमीचा सोहळा संपूर्ण भारतात थाटामाटात पार पडला. रामनवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा सूर्यतिलक करण्यात आला. दरम्यान राम मंदिराच्या मुद्द्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका बैठकीतील किस्सा सांगितला. राम मंदिराबाबत सर्वजण बोलतायत, पण सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, अशी नाराजी महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे शरद पवारांनी म्हटले. यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात, अशी तिखट टीका बावनकुळेंनी शरद पवारांवर केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे.

बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात