Puneet Balan | इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट

Puneet Balan : प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून (Indrani Balan Foundation) रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार व्यक्त करण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. आठ ते नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून याठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ट्रस्टकडून नुकतीच राजारामबापू पाटील संस्थेला एक रुग़्णवाहिका देण्यात आली. तसेच राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनीमार्फत अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात. कॅम्पमध्ये सहभागी रुग्णांना मोठ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणखी एका ॲम्ब्युलन्सची गरज होती. त्यासाठी ट्रस्टने युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांच्याकडे तशी मागणी केली. त्यांची गरज ओळखून आणि त्यांचे सामाजिक कार्य पाहून पुनीत बालन यांनी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून रुग्णवाहिकेसाठी अर्थसाह्य केले. त्याबद्दल ट्रस्टच्यावतीने बालन यांचे आभार मानण्यात आले.

‘‘रुग्णाला वेळेत उपचार मिळाले तर तो निश्चितपणे बरा होऊ शकते. त्यासाठी रुग्णवाहिका ही अत्यंत अत्यावश्यक आहे. आरोग्य सेवेत ‘डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्ट’चं कार्य कौतुकास्पद असून या कार्यामुळेच त्यांच्या मागणीवरून ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. या माधयमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत होईल, असा विश्वास आहे.’’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले