अफझल खानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात; प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

सातारा – स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या अफझल खानाच्या कबरीच्या आवारात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे अनधिकृत बांधकाम पाडलं जावं, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार अखेर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

चोख पोलीस बंदोबस्तात अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने हे बांधकाम पाडलं जातंय. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून ही कारवाई केली जातेय.अफझल खानाच्या कबरीच्या लगत असलेल्या खोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

या खोल्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या होत्या. या खोल्यांवर आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. हा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो.शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.

10 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवप्रेमींकडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.