गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज करणार कमबॅक

Faf Du Plessis Comeback: सुमारे 7 महिन्यांनंतर टी-20 विश्वचषक (T20 World Cup) आयोजित केला जाणार आहे. T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. त्याचवेळी, याआधी दक्षिण आफ्रिकेसाठी एक चांगली बातमी येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

या खेळाडूने 2021 मध्ये कसोटी फॉरमॅटला अलविदा केला होता. त्याच वेळी, 2020 च्या अखेरीस केपटाऊनमध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला होता. सध्या फाफ डु प्लेसिस हा अबुधाबी येथे होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहे. यादरम्यान त्याने सांगितले की, तो टी-२० विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे पांढऱ्या चेंडूचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांच्याशी या विषयावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

नुकतेच रॉब वॉल्टरने सांगितले होते की फाफ डू प्लेसिस व्यतिरिक्त क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो हे टी-20 विश्वचषक खेळताना दिसू शकतात. फाफ डू प्लेसिसने 2014 आणि 2016 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

फाफ डू प्लेसिस आयपीएल 2023 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. संघाचे नेतृत्वही केले. त्याच वेळी, आयपीएल 2024 पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने फॅफला कर्णधारपदी कायम ठेवले आहे. खरंतर, विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फाफ डू प्लेसिसची नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. गेल्या मोसमात फॅफ डु प्लेसिसने फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली होती. गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलनंतर फाफ डू प्लेसिस हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 14 सामन्यात 56.15 च्या सरासरीने 730 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम