माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांचा पत्ता कट? नाईक निंबाळकर यांचे तिकीट कन्फर्म?

Naik Nimbalkar: २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपा कडून जोरदार मोर्चे बांधणीला सुरवात झाली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच प्रत्येक मतदारसंघामध्ये व्यूहरचना आखली जात आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या गड मानल्या जाणाऱ्या लोकसभेत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले होते. मात्र आता माढा लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी मिळणार यावरून भाजपा मध्ये अंतर्गत कलह उफाळून येताना दिसत आहे. या मध्ये आता प्रदेशाध्यक्ष चांद्रशेकर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या वक्तव्याने आणखीन भर पडणार असल्याचं दिसत आहे.

पुणे येथे माध्यमांसोबत बोलताना चांद्रशेकर बावनकुळे म्हणाले, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी ज्या पद्धतीने विकास केला आहे ते पाहता गेली 50 वर्षात कुणी केला नाही असा मतदार संघाचा विकास केला आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली जलसिंचन, रस्ते आदी विभागात उत्तम कार्य झाले आहे. देशातील चांगले काम करणारे जे पहिले 50 खासदार असतील त्यात नाईक निंबाळकर हे निश्चितच असतील. यामुळे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघात ते निश्चितच 51 टक्केच्या वर लढाई लढतील आणि विजयी होतील. असं म्हणत तोंडभरून कौतुक केले.

उद्या जर आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार केले तर माझा दावा आहे,मी संघटना पाहतो आहे. संघटना एवढी मजबूत आहे आणि त्यांचे काम एवढे जोरदार आहेत की सत्ता आणि संघटन मिळून ते 51 टक्क्यांची लढाई लढतील. माझा दावा आहे की आजपर्यंत कुणीही घेतली नाहीत एवढी मते घेऊन त्या मतदार संघातून ते विजयी होतील. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.