Raigad | “ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय, त्याठिकाणी आमचं डोकं असावं; मात्र याच ठिकाणी…”, नामदेव जाधवांची टीका

Raigad – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पक्षाचे अधिकृत चिन्ह तुतारी घेतलेला माणूस प्रसिद्ध करण्यासाठी रायगड (Raigad) किल्ल्यावर गेले होते. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी वापरले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार पालखीत बसून रायगडवर गेले आणि तिथे तुतारी वाजवून चिन्हाचं अनावरण केलं होतं. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर बरीच टीका केली. अशातच आता नामदेव जाधव यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदेव जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्यभिषेकाचं ३५० वं वर्ष आहे. जगभरातील मराठ्यांसाठी आणि रयतेसाठी हे आनंदाचं वर्ष आहे. मात्र काही राजकीय लोक ज्यांचा टांगा पलटी झाला आहे, ज्यांचे घोडे फरार आहेत, या उद्विग्न अवस्थेत आता आपल्याला तारणहार काय आहे? तर अशा लोकांना आता मरता मरता छत्रपती शिवाजी महाराज आठवले. यासाठी हे लोक रायगडावर गेले. पण ते एवढ्या चुकीच्या पद्धतीने गेले. रायगडावर फक्त शिवरायांनी पालखीत बसून जाण्याचा प्रोटोकॉल आहे, परंतु हे लोक पालखीत बसून रायगडावर गेले. तसेच जाताना त्यांनी पुढे ढोल ताशे, तुतारी वाजत गेले. त्यामुळे शिवभक्तांच्या मनात या कृतीचा तीव्र संताप आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मी करणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

तसेच काही लोकं रायगडावरील सिंहासनावर चढले होते. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय, त्याठिकाणी आमचं डोकं अशी भूमिका घ्यावी. मात्र त्याठिकाणी काही लोकं फोटोसेशनसाठी उभी होती. हे अत्यंत चुकीचं आहे. या घटनेचा निषेध आम्ही करणार आहोत, या लोकांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी रायगड अपवित्र केला आहे, असेही नामदेव जाधव म्हणाले. शिवाय रायगड ही कोणत्याही राजकीय पक्षाचा आखाडा बनू नये, अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही