Hardik Pandya | आधी शंकरभक्ती अन् आता कृष्णाच्या चरणी! हार्दिक पांड्याचा Video व्हायरल

Hardik Pandya | आयपीएल 2024 सुरू होताच ‘मुंबई इंडियन्स’ या संघाचे वाईट दिवस सुरू झाले. संघाने सलग 3 सामने गमावले. स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले होते. त्यासाठी त्याला ‘गुजरात टायटन्स’कडून परत आणण्यात आले. गुजरातने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धा जिंकली आणिमागील हंगामात अंतिम फेरी गाठली होती. पण, आयपीएल 2024 त्याच्यासाठी खास नव्हते. आता हार्दिक पांड्याच्या कुटुंबाचा भजनावर नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

नुकताच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातच्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी पोहोचला होता. त्याचा शिवलिंगावर दुग्धा अभिषेक करतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. यानंतर पुढच्याच सामन्यात ‘मुंबई इंडियन्स’ने दणदणीत विजय नोंदवला. या स्पर्धेतील हा संघाचा पहिला विजय ठरला. यानंतर लोक म्हणू लागले की महादेवाचा आशीर्वाद घेतल्याने हार्दिक पांड्याचे नशीब उजळले आहे. त्याआधीही मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या वागण्यावर टीका झाली होती.

आता नवीन व्हिडिओमध्ये, हार्दिक पांड्या, त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक, हार्दिकचा भाऊ आणि ‘लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी)’ खेळाडू क्रुणाल पंड्या आणि त्याची पत्नी पंखुरी भजनावर नाचताना दिसले. या दरम्यान त्यांची दोन्ही मुलेही त्यांच्या मांडीवर होती. ते ‘हरे राम, हरे राम, राम-राम, हरे-हरे’ आणि ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण, हरे-हरे’ च्या तालावर नाचताना दिसले. यावेळी एक भजन गायक हार्मोनियमवर भजने वाजवत होता.

दोन्ही भावांनी त्यांच्या घरी श्रीकृष्ण संकीर्तनाचे आयोजन केले होते, असे सांगितले जात आहे. ‘मुंबई इंडियन्स’चा पुढील सामना ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विरुद्ध आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा