Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Pune LokSabha 2024 | काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे घोषीत केले. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर पुण्यात मनसेच्या सरासरी असलेल्या दहा टक्के मतांवर त्याचा कसा परिणाम होईल. याची चर्चा जोरदार सुरू झाली. गेल्या महानगरपालिका तसेच विधानसभा निवडणुकीत मनसेला लाखोंच्या संख्येने मतं पडली होती.  यंदाच्या निवडणुकीत मात्र मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या विरोधात दोन्हीही नेते हे पुर्वश्रमीचे मनसेचे राहिले आहेत. त्यामुळे मनसेने जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे मतांचं विभाजन होणार का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकांचा विचार केल्यास 2012 साली मनसेचे जवळपास 29 नगरसेवक पाच लाख 19 हजार 437 मतं घेऊन निवडून आले होते. त्यानंतरच्या 2017 च्या निवडणुकीत मात्र दोन नगरसेवकांना तीन लाख 73 हजार 645 मते पडली होती. तर लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास 2009 साली मनसेच्या खात्यात 75 हजार 887 तर 2014 साली 93 हजार 449 मते पडली होती.

शिवाय 2014 च्या निवडणुकीत मनसेकडून उभे असलेल्या दिपक पायगुडे यांनी जवळपास 93,5025 मत मिळवली होती. त्याआधी 2009 मध्येही मनसेला 75930 मतं मिळाली होती. याशिवाय 2012 आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसेला अनुक्रमे पाच आणि तीन लाख मते मिळाली होती. अशातच आता मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे याचा फायदा आपुसकच मोहोळांना होण्याची शक्यता आहे.

महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र वंचितकडून मनसेचे माजी नगरसेवक वंसत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभेची (Pune LokSabha 2024) रंगत आणखी वाढली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा