शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी 

Loksabha Election : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून (Sharad Pawar) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलीय. साता-यातून शशिकांत शिंदेंना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. मात्र, माढामधून उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे लक्ष लागलंय. आता फक्त माढाचा उमेदवार जाहीर करणं बाकी आहे. रावेरमध्ये श्रीराम पाटलांची लढत ही भाजपच्या रक्षा खडसेंसोबत होणार आहे. तर शशिकांत शिंदेंसमोर महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी ३० मार्च आणि ४ एप्रिल रोजी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानुसार वर्धेतून अमर काळे
दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग बारणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला