Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा

Nana Patole Accident: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचारांचा धडाका सुरू असताना अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघाात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावात त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. सुदैवाने नाना पटोले या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार करून माघाडी परतत असताना रात्री सुकळी या गावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मागून ट्रक वेगाने आला आणि नाना पटोलेंच्या गाडीला धडकला. यावेळी नाना पटोले गा़डीतच बसून होते. ट्रकने जोराने धडक दिल्याने गाडीचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. सुदैवानं नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षित आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला