हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा

Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या निवडणुकीची माहिती दिली.

लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले मात्र या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार? त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.