“मी केलल्या कामांवर कोल्हे निवडून आलेत, त्यांची कामंदेखील मलाच..”; शिवाजीदादांचा कोल्हेंवर निशाणा

Shivajirao Adhalrao Patil: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर मतदारसंघात (Shirur Loksabha) एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्याचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (AMol Kolhe) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं त्या गावातही आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यांना स्वतःचं काहीही दिसत नाही, स्वतःचा तालुका, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही त्यांनी काही केलं नाही आणि ते राज्याचं काय सांगत आहेत. कोल्हेंच्या जाहीरनाम्यात मी केलेली विकास कामे असून, माझ्या कामावरच कोल्हे निवडून आले, तर मतदारसंघातील कोल्हेंची कामेदेखील मलाच करावी लागतात”, असं म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर निशाणा साधला आहे.

“जे प्रकल्प ५ वर्षापूर्वी होते ते देखील आत्ता आहे त्याच परिस्थितीत आहेत. लोक सकाळपासून मला त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मी खासदार नसतानादेखील काम करत आहे. कोल्हे यांचं कर्तव्यदेखील मलाच पार पाडाव लागत आहेत”, असंही आढळराव पाटील म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल