Supriya Sule: अबकी बार गोळीबार सरकार, सुप्रियाताई सुळेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Supriya Sule: डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाच आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाच रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे, असेही यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात दुष्काळाची अत्यंत वाईट परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच पाणी हे मिळत नाहीये. पाण्याचं विषय हा खूपच गंभीर झाला आहे. माझ्या समोर बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न आहेत आणि त्यामध्ये तिथं व्यस्त आहे. दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सिरयस नाहीये. एकीकडे दुष्काळ तर दुसरी कडे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अभिनेता सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहे असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे भर रस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे असे देखील बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गॅंगची दहशत सुरूच आहे. कोयता गॅंगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गॅंगची दहशत पुणे परिसरात कायम आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं असून या सरकारला संविधान बदलायचं आहे त्यासाठी त्यांनी ४०० पार ची घोषणा दिली आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार साहेब यांच्यावर टीका ६० वर्ष सुरू आहे. आणि शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. दररोज शरद पवार साहेब यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे.आपलं नाणं गेले ६० वर्षे मार्केटमध्ये खणखणीत आहे. ही चांगली बाब आहे ना?, त्यांना काहीही करून शरद पवार यांना संपवायचं आहे आणि हे त्यांचं कटकारस्थान आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल